लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज
(२६ जून १८७४ - ६ मे १९२२)
शाहू महाराज यांची जयंती २६ जून रोजी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. शाहू महाराज हे कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती आणि एक भारतीय समाजसुधारक होते.
सर्व सामान्य जनतेला स्वाभिमानाचे नवे जीवन व सामाजिक परिवर्तनाला शाहू महाराजांनी गती प्राप्त करून दिली. कोल्हापूर संस्थानात शाहू महाराज यांनी प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले.
स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजज्ञा काढली. महाराष्ट्राला समाजसुधारकांचा वारसा लाभला असल्यामुळे शाहू - फुले - आंबेडकर यांचा महाराष्ट्र असेही म्हणतात.